'राष्ट्रपुरुषः छत्रपति श्रीशिवाजीमहाराज:" या संस्कत ग्रंथाचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात भावे प्रशालेच्या गावडे सभागहात संपन्न झाला. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. संस्कुत भाषा सर्वांपर्यत पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू. असे आश्षासन यावेळी आमदार लांडगे यांनी दिले
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ध्वनिचित्रफीत संदेशामार्फत ग्रंथ लोकार्पण सोहळ्व्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृत भारतीच्या पश्चिम-मध्य क्षेत्राचे अध्यक्ष प्रा.प्रसाद जोशी होते गंथाचे लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी ग्रंथनिर्मितीचा प्रवास आणि संशोधनकार्य याविषयी माहिती दिली पुस्तकाचा परिचय करून देताना डॉ. आफळे यांनी ग्रंथाच्या वैशिष्ट्यांची माहिती देताना सांगितले की संस्कृतमधील शिवचरित्रविषयक उपलब्ध २२ ग्रंथांचा आधार घेऊन हा ग्रंथ सिद्ध करण्यात आला आहे. २७ अध्याय उपसंहार संदर्भसची १२० तळटीपा ३० रेखाचित्रे आणि ३ नकाशे यांचा समावेश असलेला हा ग्रंथ शिवचरित्राचा अभ्यास करणारे संशोधक विद्यार्थी आणि संस्कतप्रेमी यांच्यासाठी उपयक्त ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य राष्ट्रदष्टी आणि स्वराज्यनिर्मितीचा इतिहास संस्कृत भाषेतून सवेसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा महत्त्वपर्ण प्रयत्न असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. उपस्थितांनी ग्रंथाचे स्वागत करत ह उपक्रम संस्कत भाषेच्या संवर्धनासह शिवचरित्राचा अभ्यास अधिक व्यापक करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक संस्कृतप्रेमी विद्यार्थी शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली स्त्रसंचालन स्वर्णा बोरकर यांनी केले प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट् प्रांताचे सहप्रशिक्षणप्रमख डॉ. संभाजी पाटील यांनी केले तर आभार पणे महानगराचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र शिधये यांनी मानले अतिथीपरिचय अभिजीत कानिटकर यांनी करून दिला. तसेच
लेखकपरिचय वैखरी कलकर्णी यांनी केला.